लोणंद, ता. सातारा येथील शेतीला वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शरद ओंकेश्वर ओंकार, मुळ रा. लोणसावळे, ता. वर्धा, सध्या रा. लोणंद, ता. खंडाळा असे त्यांचे नाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमलात आणलेल्या स्टॅन्ड अप इंडिया या योजनेचा लाभ, मिळावा यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने आज सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवीण दाराबाहेर आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले.
समाजातील सर्व महिला या गांभीर्याने काम करतात, आपल्याला दिलेले काम करताना त्या कामाची कोणतीही तक्रार करत नाहीत, असे प्रतिपादन शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर च्या सुमती लांडे यांनी केले.
सातारा शहराच्या पूर्वेला गोडोली परिसरात असणाऱ्या गोडोली तलावाच्या सुशोभीकरणासाठी केंद्र शासनाच्या अमृत-2 योजनेतून तब्बल साडेचार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या निधीमधून तलावासाठी विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.
चारचाकी वाहनाची जाहीरात पाहून संपर्क करत ऑनलाईन व्यवहार केल्यानंतर वाहन आणण्यासाठी गेल्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे समोर आले. यावरुन डॉ. संदीप कोतवाल व नितीन धारपुरे (दोघे रा. पुणे) यांच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये सोनाली दिपक जोशी (वय 25, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना दि. 17 रोजी उपचारासाठी दाखल केल्यानंतर 18 रोजी पहाटे त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.
‘अग्निपथ’ या केंद्र शासनाच्या योजनेवरुन काही राज्यात उद्रेक निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यातील सोशल मिडीया पोलिसांच्या रडारवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण होतील असे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. अन्यथा संबंधित व्यक्ती व ग्रुप ऍडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन एसपी अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.
पुण्याकडे भरधाव वेगाने निघालेल्या आयशर टॅम्पोने वारकर्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले असून एका वारकर्याचा मृत्यू झाला आहे.
ओबीसी आरक्षणावर जाहीर झालेल्या निकालानंतर जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गट-गण यांची अंतिम रचना जाहीर झाली असून यात ७ नव्या गटांची भर पडली आहे. गणपतीनंतर किंवा दिवाळी अगोदर ह्या निवडणुका पार पडल्या जातील असे दिसून येत आहे.
साहित्य संमेलन आणि वाद यांचे जवळचे नाते असते. त्यामुळे कोणतेही संमेलन घेताना काळाचा संदर्भ घेणे गरजेचे असते. आजच्या काळामध्ये विचार महत्त्वाचा आहे. सध्या अस्वस्थतेचे युग सुरू आहे आणि धर्माच्या दावणीला राष्ट्र बांधण्याचा प्रयत्न विविध शक्तींकडून केला जात आहे, असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.