maharashtra

स्टॅन्ड अप इंडिया योजनेचा लाभ मिळावा

भीमशक्ती संघटनेची मागणी

Benefit from Stand Up India scheme
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमलात आणलेल्या स्टॅन्ड अप इंडिया या योजनेचा लाभ, मिळावा यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने आज सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवीण दाराबाहेर आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले.

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमलात आणलेल्या स्टॅन्ड अप इंडिया या योजनेचा लाभ, मिळावा यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेने आज सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवीण दाराबाहेर आंदोलन करून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  दि.६ एप्रिल २०१६ रोजी स्टॅन्ड अप इंडिया ही योजना अमलात आणली, मागासवर्गीय दलित समाजाच्या उन्नतीसाठी १० हजार कोटी कोटी रुपये सिडकोकडे वर्ग करण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक बँकेला प्रत्येक वर्षी एक अनुसूचित जाती, एक आदिवासी आणि एका महिला उद्योजकाला बँकेकडून स्टॅन्ड अप इंडिया या सरकारी योजनेतून कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि सर्वेक्षणानुसार आजपर्यंत कुठलीही बँक ही जबाबदारी कर्तव्यदक्षपणे पार पडत नाही. मागासवर्गीय समाजातील होतकरू तरुणांना पुढे येण्यासाठी अटकाव करीत आहे. यासंदर्भात भीमशक्ती संघटनेतर्फे उपोषण केलेले आहे. त्यावेळी फसवणूक करून दोन वेळा उपोषण तोडण्यात आले. एचडीएफसी बँकेत शेखर कांबळे यांचे स्टॅन्ड अप कर्ज संदर्भातील प्रकरण  कागदपत्रांची पूर्तता करुनही रेंगाळत ठेवलेले आहे.
स्टॅन्ड अप इंडिया या योजनेचा शासन निर्णयानुसार लाभ मिळावा, बँकेने आपले स्वतःचे नियम व अटी या योजनेत लागू करू नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी राजरतन कांबळे, सयाजी कांबळे, गुलाब बनसोडे, श्रीकांत कांबळे, वामन म्हस्के, दयानंद बनसोडे उपस्थित होते.