maharashtra

वीज वितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

Junior engineer of power distribution company caught in bribery trap
लोणंद, ता. सातारा येथील शेतीला वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शरद ओंकेश्वर ओंकार, मुळ रा. लोणसावळे, ता.  वर्धा, सध्या रा. लोणंद, ता. खंडाळा असे त्यांचे नाव आहे.

सातारा : लोणंद, ता. सातारा येथील शेतीला वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शरद ओंकेश्वर ओंकार, मुळ रा. लोणसावळे, ता.  वर्धा, सध्या रा. लोणंद, ता. खंडाळा असे त्यांचे नाव आहे.
याबाबत  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, लोणंद, ता. खंडाळा येथील वीज वितरण कंपनीच्या शाखेमध्ये शरद ओंकेश्वर ओंकार,  मुळ रा. वर्धा, सध्या रा. लोणंद, ता. खंडाळा कनिष्ठ अभियंता या पदावर काम करतो. शेतीसाठी नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी एक इसम त्यांच्याकडे गेला असता शरद ओंकेश्वर ओंकार यांनी त्याला २० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार आणि त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर १२ हजार रुपये देण्याचे तक्रारदार याने मान्य केले. याबाबत तक्रारदार याने सातारा येथील लाचलुचपत पथकाकडे याबाबत रितसर तक्रार केली. पथकाने तक्रारीची पडताळणी करून दि. २० जून रोजी लोणंद येथील वाठार कॉलनी येथे सापळा लावला. तक्रारदार याच्याकडून बारा हजार रुपयांची लाच घेताना शरद ओंकेश्वर ओंकार हा अगं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रभारी पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव सुजय घाडगे,  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पो. ना. विनोद राजे, पो.काॅ. संभाजी काटकर, चालक पो.ना. मारुती अडागळे यांनी सहभाग घेतला.