Satara

esahas.com

अल्पवयीन मुलाचे अपहरण

सातारा येथील नामांकित शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

esahas.com

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी आणि भाग निरीक्षक साखरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा!

करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्‍यातील व्यापार्‍यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्याविरोधात गेली आठ महिने आंदोलने, पत्रव्यवहार करुनही त्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरु केले आहे.

esahas.com

‘ब्राईटलँड’मधील मुख्यमंत्र्यांचा मुक्काम वादग्रस्त

सातारा जिल्ह्याचे सुपूत्र तथा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दोन दिवसांत जिल्ह्याचा दौरा असला तरी ते महाबळेश्‍वर-जावली तालुक्यातच घुटमळले. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंचा हा दुसरा जिल्हा दौरा होता.

esahas.com

दोघांवर सत्तुरने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

उधारी देण्याच्या कारणावरून दोघांवर सत्तुरने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे

जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी सुमारे 3780 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.

esahas.com

मोळाचा ओढा परिसरात आढळला बेवारस मृतदेह

मोळाचा ओढा परिसरात एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळला असल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

पालिका इमारतीच्या खोदकामात आढळून आली रायफलीची काडतुसे

सातारा जिल्हा परिषदेसमोरील कल्याणी इस्टेटमध्ये सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीसाठी सुरू असलेल्या खोदकामात रायफलीच्या १ हजारहून अधिक काडतुसांचा साठा सापडला आहे. ही काडतुसे कोणत्या काळातील आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, त्यादृष्टीने ती पुरातत्व विभागाकडे दिली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

esahas.com

उद्योगधंदे बंद पडल्यामुळे बेरोजगारी : महारुद्र तिकुंडे

सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा असूनही विकासाच्या दृष्टीने मागे पाडू लागला आहे. जिल्ह्यामध्ये कोणतेही मोठे उद्योगधंदे निर्माण होत नाहीत त्यामुळे स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना इतर जिल्ह्यांचा रोजगारासाठी आश्रय घ्यावा लागत आहे.

esahas.com

सविता काशीद हिला चार वर्ष साध्या कैदेची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार करत तिचा खून केला. त्यानंतर मुलाच्या आईने त्यास मदत केल्याप्रकरणी नेर, ता. खटाव येथील सविता निलेश काशिद वय ३४ या महिलेला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ४ वर्षे साधी कैद व १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.