maharashtra

अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकावर गुन्हा


अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेसात वाजता दरम्यान अल्पवयीन मुलगी रुपाली चंद्रकांत लोणार हिला अजय जाधव (पूर्ण नाव माहित नाही) राहणार विजापूर, कर्नाटक याने पळवून नेले आहे. याबाबतची फिर्याद मुलीची आई रेणुका चंद्रकांत लोणार वय 33 राहणार मोरे कॉलनी सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.