उधारी देण्याच्या कारणावरून दोघांवर सत्तुरने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : उधारी देण्याच्या कारणावरून दोघांवर सत्तुरने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पानपट्टीची मागील उधारी देण्याच्या कारणावरून दत्तात्रय तुकाराम बेबले वय 50 राहणार रामनगर, तालुका सातारा यांच्यावर समीर सुदाम काळे राहणार नवनाथ नगर, पानमळेवाडी, तालुका सातारा यांनी सत्तुरने वार केला. ही भांडणे सोडवण्यासाठी आलेला बेबले यांचा भाऊ भानुदास तुकाराम बेबले याच्यावरही काळे याने सत्तुरने वार केला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक फौजदार बागवान अधिक तपास करीत आहेत.


