मोळाचा ओढा परिसरात एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळला असल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : मोळाचा ओढा परिसरात एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह आढळला असल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान मोळाचा ओढा सातारा येथील राजपुरोहित स्वीट्स व गॅलेक्सी फर्निचर वर्ल्ड च्या समोर एक पुरुष जातीचा बेवारस मृतदेह सापडला आहे. याबाबतची खबर किशोर भास्कर बनसोडे वय 33, राहणार करंजे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करीत आहेत.


