maharashtra

जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे


जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी सुमारे 3780 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.

सातारा : जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे मारून पोलिसांनी सुमारे 3780 रुपये किमतीची दारू जप्त केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पांगरी, तालुका माण गावच्या हद्दीत हॉटेल ब्रह्मचैतन्य स्नॅक्स सेंटरच्या पाठीमागे अमोल वसंत कदम हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 840 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या घटनेत बनपुरी गावच्या हद्दीत बनपुरी ते भालेकर वाडी जाणाऱ्या रस्त्यावर भीमराव शिवाजी मोहिते वय 65 हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1750 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.
तिसऱ्या घटनेत सागर प्रकाश मसुगडे वय 23, राहणार निगडी, सातारा हा मुरलीधर मसगुडे यांच्या घराच्या आडोशास दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 1190 रुपयाच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.