Satara

esahas.com

समीर शेख साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक

गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. पुन्हा एकदा साताऱ्याच्या होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या बदलीचे साताऱ्यात स्वागत होत आहे.

esahas.com

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव, कराड या पाच तालुक्यांच्या 77 गावांमध्ये 600 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान जाहीर करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केली आहे.

esahas.com

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात शिवसैनिकांचा ठिय्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शंभर रुपयांमध्ये एक किलो पामतेल, एक किलो साखर, एक किलो रवा आणि एक किलो डाळ असा शिधा संच 100 रुपयात देण्याची योजना जाहीर केली होती.

esahas.com

भ्रष्ट मोटर वाहन निरीक्षक ‘खटावकर’ला निलंबित करुन त्याच्या संपत्तीची चौकशी करा

सातार्‍यातील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर याने हम करे सो कायदा या नीतीनुसार परिवहन कार्यालयात उच्छाद मांडलेला आहे. काही अडेलतट्टू एजंटांना हाताशी धरुन त्याने गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधींची माया कमविलेली आहे.

esahas.com

कोंडवे येथून ४२ हजार रुपयांची चोरी

कोंडवे, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ४२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

दुखापत केल्याप्रकरणी कोंडवे येथील दोघांवर गुन्हे

दुखापत केल्याप्रकरणी कोंडवे, ता. सातारा येथील दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

खंडाळा येथून दोन जण बेपत्ता

खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

खंडाळा येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पाय घसरून विहिरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

दुखापत केल्याप्रकरणी खावली येथील दोघांवर गुन्हा

दोन जणांनी एकाला दुखापत केल्याप्रकरणी खावली, ता. वाई येथील दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

दुर्गादेवी उत्सवामध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक

येथील मंगळवार पेठेत दुर्गादेवी उत्सवात हवेत गोळीबार करून दहशत वाजवणाऱ्या चार जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह तीन मॅक्झिन व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.