दुखापत केल्याप्रकरणी कोंडवे, ता. सातारा येथील दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : दुखापत केल्याप्रकरणी कोंडवे, ता. सातारा येथील दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१८ ऑक्टोंबर रोजी ३.१५ वाजण्याच्या सुमारास कोंडवे गावच्या हद्दीत कमानीजवळ तेथीलच नंदकुमार भीमराव गाडे, लक्ष्मण भीमराव गाडे या दोघांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून राजकुमार रामचंद्र चोरगे रा. कोंडवे यांच्या डोक्यात गज मारून जखमी केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


