खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १६ रोजी ६ वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील एका घरासमोर आदित्य सचिन वेळे, वय १६ आणि अमोल दत्तात्रय वेळे, वय १७ दोघेही रा. खंडाळा हे दुचाकी क्रमांक एम. एच. १२ सीके ३२१९ तेथीलच एका घरासमोर लावून संबंधितांना आम्ही पाऊस पडत असल्याने घरी जातो असे सांगून निघून गेले, ते अद्याप परत न आल्याची तक्रार सचिन बाजीराव वेळे यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिली आहे.


