क्रीडा

esahas.com
क्रीडा

विट्यात तातडीने दोनशे बेडचे रुग्णालय उभारा

जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन गतिमान झाले आहे. खानापूर तालुक्यात कोविड रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी जागेच्या उपलब्धतेनुसार बेड उभारा. प्रसंगी खाजगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्याठिकाणी बेडची व्यवस्था करणं आवश्यक आहे. - मंत्री जयंत पाटील

esahas.com
क्रीडा

भानुदास झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला 

शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर आज प्राचार्य भानुदास झांजुर्णे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावाने जनमाणसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करताना त्यांनी कमालीची शिस्त स्वत: अंगीकारली व मुलांनाही शिस्तप्रिय बनवले. तसेच प्राचार्य झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला आहे,’ असे प्रतिपादन किशोर बर्गे यांनी केले.

esahas.com
क्रीडा

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्येचेे शेतकर्‍यांना निंबोळी अर्कविषयी मार्गदर्शन

भालवडी, ता. माण येथील शेतकर्‍यांना पाच टक्के निंबोळी अर्क हे कोणत्याही पिकांवरील किडींसाठी प्राथमिक फवारणीसाठी योग्य असते. याची माहिती देण्यासाठी व त्याचे अनुकरण आपल्या पिकांवर कसे करावे, यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, अकलुज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या अनुराधा शामराव बनसोडे हिने पाच टक्के निंबोळी अर्क कसे बनवायचे व निंबोळी अर्कचा वापर विविध पिकांवर कसा करावा, याचे शेतात प्रात्यक्षिक करून दाखवले

esahas.com
क्रीडा

खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठले दीड शतक

खटाव तालुक्यात मागील तीन दिवसांत कोरोनाचे 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी सहा रुग्णांचा बळी गेला आहे. निमसोडमधे दोन दिवसांत 10 रुग्ण सापडले आहेत. यापैकी एका 70 वर्षीय वृद्धाचा सातारा येथे मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच खटाव तालुक्यात व निमसोडमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रार्श्‍वभूमीवर 10 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

esahas.com
क्रीडा

वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांचा तीव्र आंदोलनाचा पवित्रा 

सांगली जिल्ह्यातील वजनदार नेत्यांनी कायम दुष्काळात होरपळणार्‍या माणच्या पूर्वेकडील जनतेला डावलून टेंभू योजनेतील पाण्याचा एक थेंबही न देता, सातारा जिल्ह्याच्या सीमेवरून पाणी पुन्हा सांगली जिल्ह्यातील दिघंचीकडे वळवले आहे.वरकुटे-मलवडी, शेनवडी गावच्या सीमेवरून टेंभू योजनेचे पाणी जात असताना स्वातंत्र्य पूर्व काळापासून तहानलेली जनता कसलीही तमा न बाळगता, जनआंदोलन उभारून पाणी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारचे मत पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते धीरज जगताप यांनी शेनवडी येथे व्यक्त केले.

esahas.com
क्रीडा

वनवासवाडीतील विस्तारित कक्षाचा नागरिकांना लाभ होईल 

‘खेड ग्रामपंचायतीने वनवासवाडी प्रभागात ग्रामविकासाला गती देण्याच्या उद्देशाने बांधलेल्या प्रशासकीय विस्तारित कक्षाचा कृष्णानगर, वनवासवाडी, विकासनगर या भागातील सुमारे दहा ते बारा हजार नागरिकांना लाभ होणार असून, या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी ग्रामपंचायतीने पूर्ण केली आहे,’ असे प्रतिपादन मिलिंद पाटील यांनी केले. 

esahas.com
क्रीडा

दुधेबावीत जनावरांसाठी मोफत लसीकरण व प्रशिक्षण

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित श्रीराम उद्योग महाविद्यालय, पाणीव (ता. माळशिरस) यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे कृषिकन्या प्रणिता कृष्णा जाधव हिने शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी मोफत लसीकरण व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

esahas.com
क्रीडा

‘कोरोनामुक्ती’च्या महत्त्वाच्या टप्प्यावर काटेकोरपणे काळजी घ्यावी

‘कोरोनामुक्ती’मध्ये आपल्याला चांगले यश मिळत आहे. सातारा जिल्ह्याने आठ हजार पेक्षा जास्त रुग्णांना बरे केले आहे. देशात हा विचार केला तर 28 लाखांचा टप्पा आपण गाठला आहे.आपल्या महाराष्ट्रात तब्बल सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण चित्र दिलासादायक आहे. आता गाफीलपणा बाळगू नये, सर्व प्रकारची काळजी घ्यावी,’ असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी एका पत्रकाद्वारे केले.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात 16 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून जिल्ह्यात बुधवारी सर्वाधिक 713 जण बाधित झाले. तसेच 16 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे सातारकरांची धास्ती वाढली आहे.  जिल्ह्यात आणखी 373 कोरोनामुक्त जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले  373 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक ड...

esahas.com
क्रीडा

शिक्षक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर 5 सप्टेंबरपासून 'Thank A Teacher' अभियान 

समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे शिक्षक येतात की, ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत असते. आयुष्याच्या अशा वळणावर ज्या शिक्षकांनी आपल्यावर विश्‍वास दाखवून आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते. आपल्याला आवश्यक असेल अशा वेळी आपल्यातील आत्मविश्‍वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केलेले असते. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व