मुख्यमंत्री सहाय्यता निधीस माणगंगा सहकारी पतसंस्थेच्यावतीने कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 51 हजारांचा धनादेश दहिवडी येथे तहसीलदार बाई माने यांच्याकडे माणगंगा संस्थेचे अध्यक्ष सीताराम कदम व वडूज शाखा व्यवस्थापक विजय जाधव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
महाबळेश्वर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, पाचगणी शहरानजीक असलेल्या गोडवली गावात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी रात्री गोडवलीतील 15 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गावात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. पाचगणी शहरातही आणखी 3 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 494 झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून पाहूणचार घेत असलेल्या घरगुती गणपती बाप्पांचा, मंगळवारी (दि. 1) ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पुसेगाव सुवर्णनगरीत विसर्जन झाले. दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला विसर्जनासाठी यंदा पाणवठ्यांवर एकत्र येण्याऐवजी भागाभागांतच मूर्ती विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दिली.
आजच्या युगात शेतकर्यांनी जागतिक उत्पन्न वाढीच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, शेतकर्यांचे वार्षिक उत्पन्न वाढावे व कौशल्याचा सुनियोजित वापर व्हावा, ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून वाघोली, ता. कोरेगाव येथील कृषिकन्या ऋतुजा जायकर हिने शेतकर्यांच्या शेतात जाऊन विविध प्रात्यक्षिके राबवली.
घरोघरी विराजमान झालेल्या अकरा दिवसांच्या बाप्पांना पुसेसावळी परिसरामध्ये भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत अशावेळी घरांमध्ये विलगीकरण केलेल्या लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात या मशीनमुळे जीवदान मिळत आहे. समाजाची हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ कराड ने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हे मशीन नगरपरिषदेला हस्तांतरित केले.
येथील पंचायत समितीमधील एका अधिकार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे खबरादारीचा उपाय म्हणून पंचायत समिती इमारतीमध्ये औषध फवारणी करून ती दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी 26 तर बुधवारी 10 अशा एकूण 36 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 494 वर पोहोचली आहे.
‘खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती काळंगे गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत आहे. खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजपर्यंत राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून खटाव तालुका शिक्षक समितीने हे सिद्ध करून दाखविले आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील छत्रपती शिवाजी संग्राहलयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या कोविड रुग्णायालचे काम तातडीने चालू केले आहे. या कामाची पाहणी सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केली.
वैद्यकीय अधिकारी यांनी सुरुवाती पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले आहे. दरम्यान ते स्वतः पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या वर उपचार करण्यात आले. त्यांनी ही कोरोनावर मात करत ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले. या दोन्ही ही योद्धांचा आज पोलीस प्रशासनाने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.