आजच्या युगात शेतकर्यांनी जागतिक उत्पन्न वाढीच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, शेतकर्यांचे वार्षिक उत्पन्न वाढावे व कौशल्याचा सुनियोजित वापर व्हावा, ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून वाघोली, ता. कोरेगाव येथील कृषिकन्या ऋतुजा जायकर हिने शेतकर्यांच्या शेतात जाऊन विविध प्रात्यक्षिके राबवली.
वाघोली : आजच्या युगात शेतकर्यांनी जागतिक उत्पन्न वाढीच्या स्पर्धेत सहभागी व्हावे, शेतकर्यांचे वार्षिक उत्पन्न वाढावे व कौशल्याचा सुनियोजित वापर व्हावा, ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून वाघोली, ता. कोरेगाव येथील कृषिकन्या ऋतुजा जायकर हिने शेतकर्यांच्या शेतात जाऊन विविध प्रात्यक्षिके राबवली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची कराड येथे कृषी विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत असलेली कृषिकन्या कोविड-19च्या महामारीमुळे स्वतःच्याच गावात ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्यांना त्यांच्या शेतामध्ये जाऊन फळझाडांवरील बुरशीजन्य रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी बोडस पेस्ट तयार करून ती कशा पद्धतीने झाडांवर लावायची याचे प्रात्यक्षिक दाखवून त्यासंदर्भात शेतकर्यांना माहिती दिली.
यासाठी ऋतुजाला मोकाशी संस्थेचे जनरल सेक्रेटरी अभिजित मोकाशी, उपाध्यक्ष विश्वजीत मोकाशी, कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे, प्रा. व्ही. व्ही. माने तसेच वाघोली गावचे कृषी अधिकारी चतुर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी वाघोली गावातील शेतकरी उपस्थित होते.