भानुदास झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला
किशोर बर्गे यांचे झांजुर्णे यांच्या सेवानिवृत्ती सत्कारप्रसंगी प्रतिपादन
शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर आज प्राचार्य भानुदास झांजुर्णे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावाने जनमाणसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करताना त्यांनी कमालीची शिस्त स्वत: अंगीकारली व मुलांनाही शिस्तप्रिय बनवले. तसेच प्राचार्य झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला आहे,’ असे प्रतिपादन किशोर बर्गे यांनी केले.
कोरेगाव : ‘शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर आज प्राचार्य भानुदास झांजुर्णे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावाने जनमाणसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. ज्ञानदानाचे काम अतिशय प्रामाणिकपणे करताना त्यांनी कमालीची शिस्त स्वत: अंगीकारली व मुलांनाही शिस्तप्रिय बनवले. तसेच प्राचार्य झांजुर्णे यांनी ज्ञानदानाचा वसा कायम जोपासला आहे,’ असे प्रतिपादन किशोर बर्गे यांनी केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आदर्कीचे प्राचार्य भानुदास झांजुर्णे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे आजीव सेवक एम. बी. भोसले होते.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे, कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांच्या हस्ते प्राचार्य झांजुर्णे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी एम. बी. भोसले, दादा झांजुर्णे, भाऊ झांजुर्णे, रामचंद्र बोतालजी, नितीन शिर्के, बजरंग वाघ व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.