वरकुटे येथे युवाराजे युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती कोरोनाच्या सावटाखाली मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
ज्ञानगंगा एजुकेशन सोसायटी संचलित माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल सायन्स अँड रिसर्च् सेंटर म्हसवड येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसी विद्यार्थ्यांचा इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये संस्था व महाविद्यालयाची माहिती देण्यात आली.
‘माझा गड माझा अभिमान’ या ग्रुपच्या वतीने किल्ले वारूगड (ता. माण) येथे एक आगळावेगळा उपक्रम राबवत शैक्षणिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पाचवड (ता. खटाव) मध्ये शिवजयंतीनिमित्त जाणताराजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुप यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे पुसेगाव येथील एका विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या येत्या सोमवारी होणार्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि टोपलीभर ताज्या रसरशीत भाज्या, फळझाडांचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत, वयाच्या 82व्या वर्षी देखील ताठ कण्याने दररोज रानात मजुरीने राबणार्या झिंगराअक्का कुंभार या कष्टकरी वृद्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर मानाचं स्थान आणि साडीचोळी देऊन सन्मान, अशा अनोख्या आणि शेतकरी, कष्टकर्यांच्या शेतमालाचा, श्रमाचा गौरव करणार्या कृतीने भुईंज येथील साक्षी इरिगेटर्सचे नव्या वास्तूत दिमाखात स्थलांतर झाले.
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची (Pandharpur Maghi Wari) माघीवारीही रद्द करण्यात आलं आहे. कोरोनामुळे पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pandharpur Curfew for 23rd February,Maghi wari also cancelled) कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द करण्यात आलीये. पंढरपूर शहरासह शेजारच्या दहा गावांमध्ये संच...
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने (State Corona Count increased) डोकं वर केलं आहे. राज्यात 6 हजार 281 नवे कोरोना रूग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या मुंबईत 897 बाधित रुग्ण सापडले आहेत. दिवसागणिक रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. नियमांचं पालन न केल्यास नाईट कर्फ्यूचा विचार केला जाईल असा इशारा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे....
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे. रुग्णवाढ कायम राहिल्यास दहावी, बारावीच्या परीक्षांवरही संकट येणार असल्याचं स्पष्ट होतंय. 10वी, 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांचे यांनी दिली आहे. राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकड्या...
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ती शेतावर गेली होती. त्यावेळी तिथे आधीच दबा धरून बसलेले तिघे तिला दुचाकीवरून घेऊन गेले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रात्री उशिरा तिला शेतात बेशुद्धावस्थेत फेकून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवारी संध्याकाळच्या सुमार...