महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 93 बाधितांची नोंद झाली असून, 7 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
राज्यात कोरोनाची लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, ही लाट आहे की नाही आठ ते पंधरा दिवसात समजेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे. केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे,’ असेे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
‘सुमारे दीडशे वर्षापूर्वी पासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकर्यांची मालक सदरी नावे व आणेवारी नोंद केलेला सातबारा त्यांच्या हाती दिला जात नाही, तोपर्यंत शेतकरी प्रांत कार्यालया समोरील ठिय्या आंदोलन थांबविणार नाहीत,’ असा इशारा डॉ. भारत पाटणकर निवेदनाद्वारे दिला आहे.
गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील मॅप्रो गार्डन समोर असणार्या शॉपिंग सेंटरमधील पाच दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 4 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
वडूज येथे शासनाचे नियम व अटींचे पालन करीत शिवजयंती सोहळा सर्व प्रकारची काळजी घेत संपन्न झाला. येथील बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत येणारे संकट दूर होऊन ही प्रजा सुखी व्हावी, यासाठी नतमस्तक झाले. सकाळी 11 वाजता पारंपरिक पद्धतीने वाकेश्वर येथील संतोष संभाजी फडतरे यांच्या ‘सर्जा राजाची’च्या बैलजोडी सजवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करीत शहरातून भव्य मिरवणूक
‘राज्याच्या पर्यावरण विभागाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांंतर्गत महाबळेश्वर येथील हवेची दोन वेळा गुणवत्ता तपासण्यात आली. या दोन्ही वेळी हवा तपासणीचे अहवाल उत्तम आहेत,’ अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे आद्यकर्तव्य समजत होते. शिवाजी महाराज म्हणजे भविष्याचा वेध घेणारे एक महान असे कर्मयोगी राजे होते. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ महाराजांनी अंधकारमय समजल्या जाणार्या मध्ययुगातच रोवली ही गोष्ट नक्कीच आजच्या राजकारणाला, सत्तेलाही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे,’ अ
‘कोरोना काळात सामाजिक भावना जोपासत वैद्यकीय सेवा बजावणार्या डॉक्टरांनी व नटराज युवक मंडळाने आरोग्य सुविधा उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. गणेश जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल देऊन यांनी कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला असून, मंडळाचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे,’ असे मत सातारा-जावळीचे विद्यमान आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.