मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे. ज्यात मागील दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 650 जणांवर महापालिकेकडून 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल केला ...
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 53 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला असून, 41 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
गडकरी आळी येथील जय भवानी विकास मंडळ व शिवगणेश ग्रुपमार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या या काळामध्ये खर्या अर्थाने ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली अशा कोरोना योद्ध्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळातील युवकांचे कार्य आदर्शवत असल्याचे सपोनि विशाल वायकर यांनी सांगितले.
वाई येथील ब्राह्म समाजाच्या इमारतीत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने वाई पोलिसांना ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे त्यांचे पती राजेंद्र सर्जेराव साबळे व अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त मिरवणुका न काढण्याचे आदेश जिल्हाधिकार्यानी काढूनही मिरवणूक काढल्याप्रकरणी वर्णे (ता. सातारा) येथील 19 जणांसह अज्ञात 15 ते 20 जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
माण तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील मुख्य शहर असणार्या दहिवडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती, अतिभव्य व्यासपीठ, डोळे दिपवणारी होते. फटाक्यांची आतषबाजी व शिवभक्तांचा अलोट उत्साह अशा जबरदस्त वातावरणात दहिवडी व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
डिस्कळ या गावाला ‘एलआयसी’तर्फे ‘विमा ग्राम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंतर्गत गावाला 50 हजारांचे बक्षीस देण्यात आले. विमा ग्राम हा पुरस्कार दरवर्षी चांगले विम्याचे काम करणार्या गावाला दिला जातो.
गेल्या कित्येक दिवसांपासून सातार्यातील वरच्या रस्त्यावर वाहनचालकांना अडथळा ठरणारी व्हॉल्व्हवर बसवलेली लोखंडी जाळी नगरपालिका प्रशासनाने हटवली आहे. त्याखालील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा जाळी न बसविता तेथे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
‘आज शेतकर्यांची नवी पिढी शेतीपूरक व्यवसाय करीत आहे. मधुमक्षीपालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून, याकडे शेतकर्यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पाहावे,’ असे प्रतिपादन उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांनी केले.