माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर वाढदिवस शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे उपलब्ध नसल्याने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या तर दिल्ली येथे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.
कोरेगाव येथील श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी संचलित चॅलेंज अॅकॅडमी स्कूलमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत आनंदी व उत्साही वातावरणात चॅलेंज अॅकॅडमी स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
कोरेगाव येथील ‘रनर्स फाउंडेशन’तर्फे चॅलेंज फॉर रनिंग, वॉकिंग व सायकलिंग पूर्ण करणार्या स्पर्धकांना बक्षीस वितरण सोहळा 14 फेब्रुवारी रोजी रोटरी गार्डन कोरेगाव येथे संपन्न झाला.
येथील माजी प्राचार्य रामदास चौधरी यांचे सुपुत्र व जि. प. प्राथमिक शाळा अंबवडे येथील शिक्षक विक्रांत चौधरी यांना माजी आ. प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जि. प. शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने वडूज येथील पंचायत समिती सभागृहात सन्मानित करण्यात आले.
प्रतिवर्षाप्रमाणे निमसोड येथे सोनारसिद्ध नवरात्र उत्सव मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठान निमसोड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कोरोना विषाणूचे सावट आज सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. शिवजयंती सारखा उत्सव ही त्याला अपवाद कसा ठरेल. खटाव परिसरात आज शिवजयंती उत्सव कोरोना सावटाखाली पण उत्साहात साजरा झाला.
रणसिंगवाडी (ता. खटाव) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पा घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
‘ग्रामीण भागासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान उपयुक्त असून, त्याचा वापर वाढल्यास ग्रामीण तरुणांना व्यवसाय उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय ग्रामीण महिलांना गावातच रोजगारही उपलब्ध होऊ शकेल,’ असे मत महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव (लाभ क्षेत्र विकास) राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
‘रेल्वेच्या दृष्टीने कोरेगाव तालुक्याला पूर्वीपासून महत्व आहे. मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत झाल्यानंतर रेल्वे गुड्स शेड बंद झाले. व्यावसायिक गरज आणि शेतकर्यांच्या शेतीमालासाठी कोरेगावात पुन्हा एकदा रेल्वेचे गुड्स शेड उभारणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. रेल्वे मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे,’ अशी ग्वाही पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य भरत मुळे यांनी दिली.
कराड ः गॅरेज व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-बंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. कराड येथे शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. रवी यादव (वय 24 रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. ...