जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 70 बाधितांची नोंद झाली असून, 33 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम जोरात सुरू आहे. या धरणाचा सांडवा बांधण्यासाठी कास, धावली, जुंगटी, बामणोली, तेटलीकडे जाणारी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद करून ती अंधारी कोरघळ एकीवमार्गे वळवण्याच्या हालचाली संबंधित विभागाच्या सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, तसे झाल्यास स्थानिकांना वेळेसह 20 किमीचे अंतर वाढत असल्याने मोठा भुर्दंड सोसावा लागणार असल्याने या निर्यणाविरोधात कास, धावली, बामणोली, तेटली विभागातील नागरिकांतून जनक्षोभ उसळू लागला असून कास धरणाशेजारूनच तत्काळ पर्यायी रस
‘पाटण तालुक्यातील 155 कामांना निधी कमी पडू देणार नसून, ही कामे दर्जेदार करून पाटणकरांचे स्वप्न सत्यात उतरवावे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी आज केले.
दुष्काळाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी अवकाळीने फटकारलेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर न दिल्यास सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा निर्धार वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकर्यांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत माणच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
अधिकार्यांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पुट्ट्यातील माणमधील पळशी गावचे सुपुत्र नितीन दादासो हांगे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये सलग दोन वेळा जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त करून पळशी गावासह शेतकरी असलेल्या आई-वडिलांचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. एकंदरीत एमपीएससी परीक्षेत नितीन हांगे यांची डबल हॅट्ट्रिक केली आहे.
दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दि. 20, 21 व 22 फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा ऐतिहासिक किल्ले वासोटा पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक व गिरीप्रेमी पर्यटनास येत असून, काही बालमावळ्यांचा उत्साह देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. दरम्यान, सातार्यातील हेरंब चव्हाण या पाच वर्षाच्या चिमुकल्याने मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषणेच्या स्फुरणाच्या बळावर किल्ले वासोटा पूर्णपणे यशस्वीरीत्या सर केल्याने त्याचे गिरीप्रेमींकडून विशेष कौतुक होत आहे.
खटाव पंचायत समिती यांच्यामार्फत प्रतिवर्षी देण्यात येत असलेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचामळा (कानकात्रे) येथील उपशिक्षिका कुंदा अशोक लोखंडे-कांबळे यांना अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या उपस्थितीत देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या महाबळेश्वर तालुकाध्यक्षपदी नितीन सदाशिव मालुसरे यांची निवड करण्यात आली. सदरील निवड संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष एस. आर. भोगावकर यांनी केली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या तत्त्वांवर उभे होते आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शिवइतिहास कोरला गेला,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.