जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 74 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 101 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अभियाना’ची भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ‘सायकल रॅली’ने सांगता करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दै. ‘मुक्तागिरी’शी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यात महावितरण कंपनीने शेतकर्यांकडून अन्यायकारक वीजबिल वसुली चालू केली आहे. ती तातडीने थांबवून हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेली घरगुती तथा शेती पंपाची वीज तोडणी तातडीने थांबवावी, अन्यथा आक्रोश आंदोलन तसेच रास्ता आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. आंब्याच्या मोहोर गळून पडला आहे. छोटे-छोटे झाडाला लागलेले आंबे गळून पडल्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
‘राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे,’ असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या घरात, अंगणात तसेच घराशेजारील परिसरात विविध प्रकारे केलेल्या शैक्षणिक वातावरण निर्मितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे घर हेच शाळा झाल्याची परिस्थिती वडगाव (ता. माण) येथे झाली आहे. जिल्हा परिषद शाळा वडगावचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी घेतलेल्या कष्टाचे हे फलित आहे. माण पंचायत समिती सभापती कविता जगदाळे यांनी उपक्रमाची पाहणी करून उपक्रमाचे कौतुक केले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांना घडवणार्या, तसेच लोकमान्य टिळक, म. जोतिबा फुले, क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदींनाही तालीम देणार्या क्रांतिगुरू वस्ताद लहुजी यांची जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ वडजल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कातरखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची दैना उडाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या झळा सोसून कसातरी सावरलेल्या बळीराजाला अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 94 बाधितांची नोंद झाली असून, तीन बाधितांचा मृत्यू झाला तर 67 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 88 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा मृत्यू झाला तर 49 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.