छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या संख्येने लष्करी सेवेचा वारसा जपणार्या गावांपैकी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी शेकडो जवान देशसेवेसाठी राष्ट्राला अर्पण केले आहेत. याच सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी दिल्ली येथे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची भेट घ
आपण अनेक वेळेला असे म्हणतो की, जगात अशक्य असे काहीच नाही. एखाद्या चांगल्या कार्याला मदत करण्यासाठी आर्थिक सहकार्याबरोबरच आपल्या शारीरिक कष्टानेही आपण त्यांना मदत करू शकतो. असेच एक ध्येय वेडे महाराष्ट्रातील सायकल प्रेमींचे हिरो डॉ. अमित समर्थ हे डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी’ या प्रकल्पास आर्थिक सहकार्य मिळावे व जे आदिवासी भागात नवोदित खेळाडू आहेत, अशा मागास भागाला उत्तम क्रीडा साहित्य मिळावे, सोयीसुविधा मिळाव्या यासाठी सायकलिंग करत आहेत.
लोणंद-नीरा रोडवर पाडेगाव जवळ भवानीमाता मंदिराजवळच्या तीव्र उतारावर दोन डंपरमधे झालेल्या भीषण अपघात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 38 बाधितांची नोंद झाली असून, 110 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘साखर कारखान्यांच्या माध्यमातून सत्तेची फळे चाखणारे शेतकर्यांच्या एफआरपीबद्दल मूग गिळून बसले आहेत. वर्षभर घाम गाळणार्या शेतकर्यांना कायम कर्जबाजारी ठेवून, साखर कारखानदार राजकारणाची पोळी भाजत आहेत, त्यांना शेतकर्यांच्या हक्काची एफआरपी रक्कम द्यावीच लागेल, अन्यथा 28 फेब्रुवारीपासून साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन छेडले
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेची वार्षिक सभा सहा महिने लांबणीवर पडली. सभासदांना सभेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही तरी ऑनलाइन सहभाग घेता यावा व सूचना मांडता याव्यात म्हणून संस्थेने वार्षिक सभा झूमवर आयोजित केली असून, त्यासाठी लिंक दिली आहे. संस्थेने ठेवी व कर्जवाटपात नेहमी तरलता ठेवली आहे. लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात अर्थकारण थांबल्याने अनेक पतसंस्था अडचणीत आल्या असताना आपल्या संस्थेत सर्वच बाबतीत व्यवसायात वाढ झाली आहे. हे छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेवरील विश्
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 73 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 45 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘सातारा तालुक्यातील भाटमरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी महिलांना गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे. सातही जागांवर महिला बिनविरोध झाल्या असून, महिलाराज असलेल्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होईल. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
कास ग्रामस्थांनी कास धरणाचे काम बंद पाडून बेमुदत आंदोलन सुरू केले होते.आमच्या दहा विविध मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा अखेर कास ग्रामस्थांनी घेऊन कास धरणाचे काम बंद पाडले होते. अखेर आज खा. उदयनराजे भोसले यांचे मध्यस्थी केल्याने कास ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे.
सातारच्या माजी उपनगराध्यक्ष आणि सातारा विकास आघाडीच्या माजी नगरसेविका दीपाली गोडसे यांची मानव सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.