दीडशे वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतकर्यांच्या नावावर स्वतः कसत असलेल्या शेतकर्याच्या नावावर करून कुळाचे नाव सातबार्यावरून काढून कसणार्या शेतकर्यांच्या नावावर सातबारा करण्याच्या मागणीसाठी 11 फेब्रुवारीपासून दहिवडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचे आंदोलन सुरू असून माणच्या इतिहासातील सर्वात जास्त दिवस चालू असलेले हे दुसरे आंदोलन आहे. यापूर्वी टेंभू पाण्यासाठी 16 गावांच्या लोकांचे नेतृत्व अनिल देसाई यांनी केले होते. त्यानंतर सर्वात जास्त दिवस माणमध्ये सुरू असलेले हे क
पाचगणी महावितरण कार्यालयाचे दोन कर्मचारी बील वसुलीसाठी गेले असता खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे मारहाण झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, महावितरणच्या कर्मचार्यांनी आज याविरोधात काम बंद आंदोलन करून पोलीस ठाण्यात मारहाण करणार्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
येथील प्राथमिक शिक्षक विजयकुमार मोहनराव बाचल यांना चेन्नई येथील कलाम फाउंडेशनतर्फे दिला जाणारा इंटरनॅशनल गोल्डन टीचर अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. चेन्नईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती गणेशकुमारन, सिनेअभिनेते विजयकुमारन आदींच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला.
पळशी (ता. खटाव) येथील सुपुत्र व वांझोळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक शंकर विठ्ठल देशमाने यांना खटाव पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे.
मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठी विभागप्रमुख प्रा. घनश्याम गिरी यांनी दिली.
मराठी राजभाषा दिन व थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने दि. 27 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रंथालय शास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. आशा जिरगे यांनी दिली.
माण तालुक्यातील पिंगळी खुर्द गावच्या सरपंचपदी लक्ष्मण काशिनाथ जाधव तर उपसरपंचपदी शांताबाई शिवाजी आवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
‘राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रमाबाई आंबेडकर, मदर तेरेसा, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख अशा अनेक नवरत्नांमुळे ही माती पवित्र झाली. या पवित्र मातृभूमीत जन्म घेतला त्याचा आज आपल्या प्रत्येक महिलांनी त्यांचे विचार आचाराप्रमाणे वागणे गरजेचे आहे. कोणताही अत्याचार सहन करून नका, त्याचा विरोध करा. महिला ही माया, ममता, प्रेम याचा सागर आहे, पण वेळ पडल्यास दुर्गा व महाकाली अवतार घेऊन राक्षसी प्रवृत्ती असणार्या नराधमांचा वध कराय मागे पुढे पाहत,’ असे प्रतिपादन म्हसवड पालिकेच्या माजी उपन
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका योगिता संग्रामजित गोसावी यांना यंदाच्या तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 130 बाधितांची नोंद झाली असून, 59 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.