वडूज शहरात रात्री ८ वाजल्यानंतर कोणी ही बाहेर पडू नका अन्यथा कारवाईला सामोरे जाल असा इशारा वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी दिला आहे. सध्या जिल्हयात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आज पासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यत जमावबंदी व संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आदेशाचे सर्वांनी पालन करायचे आहे. असे ...
‘स्वच्छ सुंदर पाचगणी’च्या यशाला लोकसहभागाची जोड मिळाल्यानेच पाचगणी देशाला दिशादर्शक ठरले, असल्याचे प्रतिपादन पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांनी राजस्थान येथील अल्वा येथे केले.
वडगाव ज. स्वा ते रहाटणी रस्त्यालगत असलेले गुरवकीचे माळ या नावाने परिचित असलेल्या शिवारात दोन विद्युत पोल वाकलेले असून, ते पोल केव्हाही ढासळून अनर्थ होण्याची शक्यता दिसून येत आहे. तत्पूर्वीच विद्युत महामंडळाने त्या पोलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्या शिवारातील शेतकर्यांकडून केली जात आहे.
गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तर त्यानंतर झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणार्यावर 1000 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. कचरा टाकणार्याचा फोटो काढून पाठविणार्याला 500 रुपये बक्षीस देण्याचेही ठरवण्यात आले.
कोरोना महामारला आळा घालण्यासाठी लसीकरण युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोनावरील लस पूर्णपणे सुरक्षित आहे. शासनाच्या निकषानुसार सातार्यात लसीकरण सुरु असून लसीकरणाला जेष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणसाठी येणार्या नागरिकांचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आभार मानले आणि कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनीच आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन नागरिकांना केले.
‘महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, ही काळाची गरज असून संघर्षाच्या क्षणी आपण स्वावलंबी असले पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवालयात रविवारी म्हसवड येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरी भक्तांच्या वतीने 275 किलो वजनाच्या सुखामेवा व इतर वस्तूचा आरास करुन अभिषेक घालण्यात आला व सांयकाळी तो सुखामेवा भक्तांना सालकरी अविनाश गुरव यांनी प्रसाद म्हणून वाटप केला.
‘शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी वयाच्या केवळ 23व्या वर्षी देशासाठी केलेले बलिदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि शौर्य तरुण पिढीला दीपस्तंभाप्रमाणे आहे,’ असे प्रतिपादन विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.
राजकारणात समाजकारणाची आस असणार्र्या लोकांचे कार्य हे शाश्वत विकासाची गंगा निर्माण करणारे असते, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही आणि असे कार्य हे भावी पिढीसाठी आदर्श निर्माण करते, ही वस्तुस्थिती आहे. अशाच ध्येयवादी धोरणासाठी परिचित असणारे बुधाच्या लोकनियुक्त सरपंचांनी केलेल्या पारेषणमुक्त ग्रामपंचायत या कामाची प्रशंसा आज खटाव तालुक्यात होत आहे.
‘जावलीच्या खोर्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने गनिमी काव्याने शत्रूशी दोन हात करीत स्वराज्य निर्माण केले, त्याप्रमाणे आज मेढा पोलिसांची कामगिरी देखील कौतुकास्पद असून कुख्यात गुंड गजा मारणे याला ज्या पद्धतीने पकडले तशीच कामगिरी करीत भविष्यात तालुक्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी यावर पोलिसांची करडी नजर राहून तालुक्यात कायदा व सुव्यवस्था चांगली राहील, यासाठी मेढा पोलीस कायम प्रयत्नशील राहतील,’ अशी आशा जयश्री गिरी यांनी व्यक्त केली.