येथील जुना मोटार स्टँड परिसरात नगरपंचायतीने उभारलेले सार्वजनिक स्वच्छतागृह खुले करण्याच्या मागणीसाठी ‘सोनेरी ग्रुप’ने अभिनव पद्धतीने भीक मांगो आंदोलन छेडले. हलगीच्या निनादात बाजारपेठेत त्यांनी भीक गोळा केली. या आंदोलनाची दिवसभर शहरात चर्चा होती.
‘शाळेमध्ये शिक्षक हे ज्ञान देण्याचे महान कार्य करीत असतात. कितीही सुखद असली तरी सेवानिवृत्ती ही एक संपणारी वाट असते; पण संपणार्या वाटेसोबत उगवणारी एक पहाट असते. खरा शिक्षक कोण असतो तर विद्यार्थ्याला जो जीवन जगण्याची कला शिकवितो. शिक्षक हा खर्या अर्थाने नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतो ते काम खर्या अर्थाने मधुकर सूर्यवंशी यांनी केले,’ असे गौरवोद्गार शिवव्याख्याते ह. भ. प. संतोष भांदिर्गे यांनी काढले.
खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस तत्काळ अटक करून प्रकरण दडपणार्या अधिकारी आणि राजकीय पुढार्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी आज जनता क्रांती दलाने केली आहे. याबाबत आज खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या ‘जल जीवन मिशन’मध्ये सातारा जिल्ह्याने 2020-21 मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार 1 लाख 47 हजार 60 इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
उरमोडी नदीपात्रात गजवडी गावानजीक असलेल्या उरमोडी पुलावर जणू कचर्याचे डंपिंग ग्राउंड झाले होते. कोणीही यावे आणि मृत जनावरे आणि कचरा टाकावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच याचा नाहक त्रास हा स्थानिक तसेच पाणीपुरवठा योजना अंतर्गत येणार्या गावांना होत असल्याने याची दखल माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले यांनी घेतली. गजवडी ग्रामपंचायतीशी संपर्क साधत या परिसरात श्रमदान सुरू केले. रविवारी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, गजवडीचे सरपंच बल्लाळ,
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव तर सचिवपदी मोहनराव जाधव यांची निवड करण्यात आली.
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शासन नियमांनुसार शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र, हिंदवी पब्लिक स्कूलने डिजिटल क्लास रुम आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून ऑनलाईन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी ‘हिंदवी’च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. ते अविरतपणे सुरूच आहे. यासाठी शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी केलेले काम निश्चित कौतुकास्पद आहे,’ असे गौरवोद्गार खा. उदयनराजे भो
‘वीज वितरण कंपनीकडून सध्या शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात आहे. कंपनीने ही पिळवणूक तातडीने थांबवावी,’ अशी मागणी भूमाता शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मराज जगदाळे यांनी तहसीलदारांकडे निवेनाद्वारे केली आहे.
येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या तब्बल 132 कामगारांना पूर्ण वेतन वाढ देण्याचे कारखाना प्रशासनाने जाहीर केले असून, यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर व महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. सदरची वेतनवाढ जाहीर झाल्यामुळे यासर्व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, सर्वांनी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांचा सत्कार करून विशेष आभार मानले.
केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या निकषात बसणार्या सर्व जिल्हावासियांनी कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.