टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवून नवा इतिहास नोंदविला होता. अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याने हॉकी इंडियाने मनप्रीत सिंगकडे नेतृत्व सोपविले आहे.
महाड, रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर मुले व मुलींच्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा संघाचे प्रतिनिधित्व करताना सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ४ सुवर्ण पदक, १ रौप्यपदक आणि १ कांस्य पदक अशा एकूण ६ पदकांची कमाई केली.
20 वर्ल्ड कप संपताच आता पुढील क्रिकेट सीरिजचे वेध लागले आहेत. राहुल द्रविड टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक झाल्यापासून ही भारतीय क्रिकेट टीमची पहिली सीरिज न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रच्या शिवराज राक्षेने उत्तर भारतीय मल्लांचे तगडे आव्हान मोडून काढीत खुल्या गटात सुवर्णपदक मिळवले. फ्रीस्टाईल प्रकारात पुरुष व महिला मल्लानी दोन रौप्य आणि सात कास्य ग्रीकोरोमनमध्ये देखील तीन कास्यपदकासह महाराष्ट्राच्या संघाने दहा कास्यपदकाची कमाई करीत घवघवीत यश प्राप्त केले.
नीरजला नुकताच देशातील सर्वोच्च क्रिडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून १३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिला जात आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल त्याचे खूप कौतुक झाले आहे.
विश्वचषकानंतर विराट कोहलीने आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचे नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आला आहे. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोरोना महासाथीचे संकट अजून पूर्णत: टळले नाही आणि याच कारणामुळे कित्येक क्रीड संस्था या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय खबरदारी बाळगत आहेत. याच पार्श्वभूमीवर इस्तंबूलमध्ये पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला मार्च २०२२ पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील आव्हान संपुष्टात आले. आता भारताची नामिबियाविरुद्धची लढत फक्त औपचारिकता असेल.
युवराज सिंग संघात डाव्या हाताचा फलंदाज होता. ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता,
एएफसी 23 वर्षांखालील वयोगटाच्या आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने दुसरे स्थान पटकाविले. ई गटातील शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने शूटआऊटमध्ये किर्गी प्रजासत्ताकचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत गोलफलक कोरा राहिल्याने शेवटी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.