राजधानी दिल्लीमध्ये परीसा कम्युनिकेशनद्वारा आयोजित मिसेस युनिव्हर्स या स्पर्धेत साताऱ्याच्या डॉ. राजश्री चैतन्य ठोके यांना मिसेस एशिया पॅसिफिक युनिव्हर्स या किताबाने गौरवले गेले आहे.
दिव्यांगांना भेडसावणार्या अनेक तक्रारींचा पाठपुरावा करीत असतानाही सातारा प्रशासन दिव्यांगांच्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असल्याने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय हणमंत पवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
लग्नाचे अमिष दाखवून युवतीवर सातारा शहर आणि आणि जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कृष्णकांत सूर्यकांत इंदलकर 393 करंजे पेठ जुना हायवे पाराजवळ याच्यावर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा तालुक्यातील परळी, वडूथ, नागेवाडी येथील अवैध जुगार अड्डयांवर सातारा तालुका पोलिसांनी नुकतीच कारवाई केली. यात ७ जणांवर कारवाई करण्यात आली.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पित्याने स्वतःच्या अल्पवयीन बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पित्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बाप-लेकीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेज च्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या इन डोअर आनंद स्विमिंग पूल चे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते, तर विद्यालयाच्याच भागीरथी क्रिकेट नेट प्रॅक्टिस ग्राउंडचे उद्घाटन सातारा -जावली तालुक्याचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
सातारा शहरात पोस्टमनची सेवा बजावलेले रामदास श्रीपती शिर्के यांनी येत्या 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाचा इशारा दिला आहे.