राजधानी दिल्लीमध्ये परीसा कम्युनिकेशनद्वारा आयोजित मिसेस युनिव्हर्स या स्पर्धेत साताऱ्याच्या डॉ. राजश्री चैतन्य ठोके यांना मिसेस एशिया पॅसिफिक युनिव्हर्स या किताबाने गौरवले गेले आहे.
सातारा : राजधानी दिल्लीमध्ये परीसा कम्युनिकेशनद्वारा आयोजित मिसेस युनिव्हर्स या स्पर्धेत साताऱ्याच्या डॉ. राजश्री चैतन्य ठोके यांना मिसेस एशिया पॅसिफिक युनिव्हर्स या किताबाने गौरवले गेले आहे.
त्यांची निवड यावर्षी फिलिपिन्स येथे होणाऱ्या मिसेस युनिव्हर्स या स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत देशभरातील 50 हून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला आहे, असे स्पर्धेच्या आयोजक तबसुम्म हक यांनी सांगितले.
या स्पर्धेत स्तनाच्या कर्करोगासंबंधी जनजागृती करण्यासाठी देशभरातील अनेक सौंदर्यवतीने सहभाग घेतला आहे. डॉ. राजश्री ठोके या व्यवसायाने रेडिओलॉजिस्ट असून त्या साताऱ्यातील सुप्रसिद्ध कान, नाक, घसा सर्जन डॉक्टर जयवंत ठोके व यां योगाचार्य सौ. शैलजा ठोके यांच्या स्नुषा व कान, नाक, घसा सर्जन डॉ. चैतन्य ठोके यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.


