पित्याने स्वतःच्या अल्पवयीन बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पित्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पित्याने स्वतःच्या अल्पवयीन बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पित्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पूजा शामराव यादव राहणार फॉरेस्ट कॉलनी सातारा आणि सुयश शिवदास जाधव राहणार पुनावळे जिल्हा पुणे हे पती पत्नी विभक्त झाले असून त्यांच्या मुलीचा ताबा पूजा यादव यांच्याकडे आहे. सुयश जाधव यांना मुलगी किमया हिला भेटण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली असल्याने दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास सुयश जाधव हे मूलीला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी पूजा यादव यांची परवानगी न घेता किमया सुयश जाधव (वय 6 वर्षे) हिला पळवून नेले. तसेच आज अखेर त्यांनी तिचा ताबा पूजा यादव यांना दिला नाही व पूजा यादव यांना फोनवरून धमकी दिली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. बी. निंबाळकर करीत आहेत.