आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असताना आदेशाचे उल्लंघन करून दिनांक 18 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या येथे बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ता अरबाज शेख, अमोल रवींद्र शिंदे, असीम रशीद नगारजी, प्रकाश मोरे आणि इतर तीन ते चार आंदोलनकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


