हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय गोरख माळी रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथ वाडी वाई याला सातारा पोलीस अधीक्षक यांनी एक वर्षाकरिता संपूर्ण सातारा जिल्ह्यातून हद्दपार केलेले असताना या हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून अक्षय माळी हा दि. 18 जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वाई शहरात फिरत असताना आढळून आला. याप्रकरणी त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस नाईक कांबळे अधिक तपास करीत आहेत.


