maharashtra

बाप-लेकीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


बाप-लेकीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : बाप-लेकीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 19 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास काळंगवाडी, ता. वाई गावच्या हद्दीत बुद्ध विहारासमोरील सार्वजनिक रस्त्यावर अनिल शंकर शिंदे वय 65 रा. काळंगवाडी, ता. वाई हे त्यांच्या मुलीसोबत जात असताना तेथीलच देविदास अनिल शिंदे याने दारूच्या नशेत तुम्ही पोलीस ठाण्यात का तक्रार दिली. असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून या बाप-लेकीला दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार धायगुडे करीत आहेत.