maharashtra

साताऱ्यातील तीन जुगार अड्डयांवर छापे


सातारा तालुक्यातील परळी, वडूथ, नागेवाडी येथील अवैध जुगार अड्डयांवर सातारा तालुका पोलिसांनी नुकतीच कारवाई केली. यात ७ जणांवर कारवाई करण्यात आली.

सातारा : सातारा तालुक्यातील परळी, वडूथ, नागेवाडी येथील अवैध जुगार अड्डयांवर सातारा तालुका पोलिसांनी नुकतीच कारवाई केली. यात ७ जणांवर कारवाई करण्यात आली.
परळी, ता. सातारा येथील हॉटेल निकम जवळील मानसिंग कृष्णा दळवी यांच्या घराच्या पाठीमागील बोळात सुरु असलेल्या अवैध जुगार अड्डयावर सातारा पोलिसांना छापा टाकला. यात आनंदा हणमंत गंगावणे (वय ५१, रा. परळी), गणेश लक्ष्मण चिंचकर (वय ५५, रा. म्हसवे, ता. सातारा), लक्ष्मण शंकर लोटेकर (वय ४६, रा. परळी), अनिल बापुराव मोहिते (वय ३२, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सातारा), सुरेश लक्ष्मण दळवी (रा. परळी) यांना अटक केली. त्यांच्याकडून २१ हजारांचा मुद्देमाल, दोन मोबाईल, जुगाराचे साहित्य जप्त केले.
वडूथ, ता. सातारा गावच्या हद्दीत आसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत कण्हेर कॅनॉल लगतच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगारावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली. यात सुमित राजेंद्र गुप्ते (रा. दिव्यनगरी, शाहूपुरी) यांच्यावर कारवाई केली. त्याकडून मोबाईल, दुचाकीसह ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेेच नागेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत गुरुकृपा ॲटो गॅरेजच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्येही कारवाई करण्यात आली. त्यात महादेव मडीवळ नाटेकर (वय ३७, रा. नागेवाडी) याला ताब्यात घेतले.