हॉटेलमधील नोकराने 31 हजारांचा मुद्देमाल लांबवल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सिव्हिल हॉस्पिटल मधून गंठणाची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लोणंद -सातारा रोडवर विश्रामगृहाजवळ एका अज्ञात टेम्पोने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर, एक जण किरकोळ जखमी झाला.
भावानेच मावस बहिणीचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे या खूनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
सातारा शहरालगतचे उपनगर असलेल्या खेड मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी येत नसल्याने हजारो लोकांची गैरसोय झाली असून त्यांना ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
रणजितदादांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मला टीका टिप्पणी करण्यात वेळ घालवायचा नाही, मला फलटण तालुक्याचा विकास करायचा आहे, असे सांगून विरोधकांना चितपट केले व त्यांच्या या शब्दाने तालुक्यातील जनतेची मने जिंकली आहेत.
मोटरसायकलच्या समोरासमोरील धडकेत एक ठार, दोन जखमी झाल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चेन स्नॅचिंग झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
राहत्या घरी स्वतःस पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.