एकावर कुकरीने वार केल्याप्रकरणी तिघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकावर कुकरीने वार केल्याप्रकरणी तिघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लहान मुलांची भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या खेलाजी महादेव मदने रा. शिवथर, ता. सातारा याला अक्षय मोहन जगदाळे, सुनील गणेश जगदाळे, जय तानाजी यादव सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव यांनी लाथाबुक्क्यांनी आणि कुकरीने मारहाण करून जखमी केले. याबाबत संबंधितांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक कुंभार करीत आहेत.