maharashtra

गुरुकुल स्कुलच्या अमोल जाधव यांची राष्ट्रीय पॅरा योगासन स्पर्धेसाठी निवड

अंध विभागातून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

गुरुकुल स्कुलच्या अमोल जाधव यांची राष्ट्रीय पॅरा योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून अंध विभागातून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

सातारा : गुरुकुल स्कुलच्या अमोल जाधव यांची राष्ट्रीय पॅरा योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून अंध विभागातून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
मनाची जिदद् प्रबळ असेल तर शारीरीक व्यगांवरही मात करता येते, याचाच प्रत्यक्षात अनुभव गुरुकुल स्कूल, सातारा येथे शिपाई पदावर कार्यरत असणारे अमोल जाधव यांच्या जिद्दीतून, कष्टातून अनुभवयास आला. महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशन अंतर्गत पुणे येथे नुकत्याच दिव्यांग (पॅरा) मुलांच्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्हयातील सातारा योगासन स्पोर्टस असोसिएशन अंतर्गत विविध तालुक्यातील अनेक दिव्यांग विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये मतिमंद व अंध स्पर्धक सहभागी झाले होते.
गुरुकुल स्कूल मध्ये शिपाई पदावर कार्यरत असणारे अमोल जाधव हे मेहनती व कष्टाळू स्वभावाचे असून त्यांनी या स्पर्धेमध्ये अंध विभागातून सहभाग घेतला होता. रोज नित्यनियमाने ते सकाळी विविध योगासनांचा सराव करतात. काही दिवसांपूर्वी जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये त्यांनी व्दितीय क्रमांक मिळवला.
पुढील महिन्यात राष्ट्रीय स्पर्धेसाठी अमोल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबदद्ल गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चोरगे, मुख्याध्यापिका शिला वेल्हाळ (माध्यमिक), मुख्याध्यापिका अनुराधा कदम (प्राथमिक) विश्‍वनाथ फरांदे, सोनाली तांबोळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले की, अमोल जाधव यांचे यश गुरूकुल स्कूलमधील विद्यार्थ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तसेच अमोलने राष्ट्रीय स्पर्धेतही दैदिप्यमान कामगिरी करत यश मिळवावे.
गुरुकुल स्कूलच्या योग शिक्षिका निलिमा खांडके यांनी अमोल जाधव यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय पातळीवर योगासन स्पर्धेसाठी निवड झाल्याबदद्ल गुरुकुल स्कूलचे सचिव आनंद गुरव, संजय कदम, उदय गुजर, जगदीश खंडेलवाल, दीपक मेथा, ऐंड .राजेंद्र बहुलेकर, मधुकर जाधव, नितीन माने व शिक्षक यांनी अभिनंदन करत अमोल जाधव यांना शुभेच्छा दिल्या.