खासगी सावकारी प्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकावर चाकूने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सध्याची नवीन पिढी इंग्रजी शिक्षण घेत असल्यामुळे मराठी वाचनाचे प्रमाण फार कमी झाले असल्याची खंत तारांगण मासिकाचे संपादक जेष्ठ पत्रकार मंदार जोशी यांनी व्यक्त केली.
माझ्यावर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत. त्यातील काही महान व्यक्तींनी पेटींगबाबत इच्छा व्यक्त केली. बघू त्यांच्या इच्छेचे. लोक तुमच्यावर पण प्रेम करतील तेव्हा तुमचेही पेंटींग लावतील, अशा खोचक शब्दात आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर खासदार उदयनराजेंनी टीका केली.
करंजे येथे अज्ञाताने कडी-कोयंडा तोडून घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
देगाव ता. सातारा येथे दारु विक्री प्रकरणी महेश नारायण सुर्यवंशी वय ४१, रा. देगाव याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोनगाव तर्फ सातारा येथील सुवर्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत चेअरमनसह एकूण 16 जणांनी 67 लाख 51 हजार 910 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वनवासमाची येथील निर्जनस्थळी महिलेचा खून झाल्याची घटना बुधवार रोजी उघडकीस आली आहे.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन होणार जल्लोषात साजरा होणार असून यादिवशी विविध उपक्रमांचे मनसे पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी आयोजन केले असल्याची माहिती मनसे चे जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी दिली. दरम्यान, याच दिवशी गरजूंना खाद्यपदार्थांचे वाटपही करण्यात येणार आहे.
राधिका रस्त्यावर सुरू असलेला ‘ओपन बार’ पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बुधवारी ‘क्लोज’ करण्यात आला. उशिरा का होईना पालिकेने मद्यपींचा अड्डा बनलेल्या येथील हातगाड्यांवर धडक कारवाई केल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.