मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट ते वाढे फाटा सर्व्हिस रोडवर विनेश कुमार नायर याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एमएच 11 सीएच 9684 ही बेदरकारपणे चालवून रस्त्याच्या सिमेंटच्या डिव्हायडरला घासली. त्यामुळे त्याच्या पाठीमागील सीटवर बसलेल्या सुगंधा सुरेंद्रन यांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.


