सातारा शहरात सुमारे पन्नास हजारांची घरफोडी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सातारा शहरात सुमारे पन्नास हजारांची घरफोडी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 ते 10 मार्च दरम्यान निशिगंधा कॉलनी, शिवराज सातारा येथील जमीर कबीर शेख यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील खिडकीतून आत मध्ये हात घालून दरवाजाची कडी काढून अज्ञात चोरट्याने पन्नास हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार दगडे करीत आहेत.


