maharashtra

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आशुतोष प्रमोद बोराटे वय 25 राहणार पिरवाडी गोरखपुर सातारा याने शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा ऑक्टोबर 2022 ते ४ मार्च 2023 दरम्यान वेळोवेळी पाठलाग करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी बोराटे याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.