महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक ऑगस्ट 2022 ते १० मार्च 2023 दरम्यान आर्थिक अडचणीचे कारण सांगून शुभम प्रमोद पवार रा. भैरवनाथ मंदिर रोड गोडोली, सातारा याने श्रीमती वैष्णवी पंकज जावळे रा. क्षेत्र माहुली, सातारा यांची सुमारे 3 लाख 18 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.


