पालिकेत काम करत असताना कर्तव्यावर, तसेच इतर कामांदरम्यान मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची कार्यवाही १९९७ पासून झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वयो मर्यादेचा सामना करावा लागत आहे.
ग्रंथालय व वाचनालयात ज्या नागरिकांनी कोविड-19 च्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, अशाच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा. ग्रंथालयामध्ये सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये कायमस्वरुपी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे. ग्रंथालयामध्ये सर्व नागरिकांनी तोंडाला मुखपट्टी (मास्क) बांधणे बंधनकारक आहे.
राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये २५ नगरसेवक वाढणार आहेत. शासनाच्या या निर्णयाने वॉर्ड आरक्षण आणि वॉर्ड रचना यांच्यात फेरबदल होऊन मतदारसंख्या मात्र निश्चित विभागली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत असून विविध दालनांच्या अद्ययावतीकरणाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. या कामाचा तब्बल सव्वातीन कोटी रूपयांचा निधी प्रलंबित आहे. सातारा एसटी आगारासमोरील छत्रपती शिवाजी संग्रहालयाची जुनी इमारत मोडकळीस आली असून येथे पुरातत्व विभागाच्या ऐतिहासिक वस्तूंचे मोठे दालनं आहे.
शिवरायांच्या ऐतिहासिक कार्याचा मानबिंदू असलेली घटना असून बुधवार दि. 10 रोजी प्रतापगडावर भारतीय रक्षक आघाडीतर्फे कृष्णा भास्कर कुलकर्णी व अफझल खान वध दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आघाडीचे संस्थापक टेक्सास गायकवाड यांनी दिली.
सामाजिक जाणिवेमधुन, सातारच्या सैनिक बँकेच्या माध्यमातुन भिमाबाई आंबेडकर चौकात उभारण्यात येणारे कर्नल आर.डी.निकम ट्रॅफिक आयलॅन्ड व त्या अनुषंगाने करण्यात येणारे सुशोभिकरण निश्चितच आदर्श व शहराचे सौंदर्यवृध्दी करणारे ठरेल, असे मत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना वेळच्या वेळी देणारा कारखाना म्हणून अजिंक्यतारा साखर कारखान्याचा नावलौकिक आहे. राज्यातच नव्हे तर देशात अजिंक्यतारा कारखान्याने एक आदर्श निर्माण केलेला आहे. कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून शेतकऱ्यांना आणखी चांगला ऊसदर देता यावा यासाठी उपपदार्थ निर्मीतीवर जास्त भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
गुरुवार परज येथे गुरुवारी सांयकाळी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या रेडमुळे जुगारबाजांची पळापळ झाली. पोलिसांनी संशयितांची धरपकड करुन रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
'हॅलो, तुमचे सिम कार्ड बंद होईल. सुरु ठेवण्यासाठी लिंक पाठवतो, त्यावर 10 रुपयांचा रिचार्ज मारा,’ असे सांगत तक्रारदार यांच्या खात्यावरुन 3 लाख 5 हजार 700 रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी अज्ञाताविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाटेत थांबलेल्या चार युवकांना काय झालं, असे विचारल्याच्या कारणावरून एका युवकाचा बुक्कीने दात पाडल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे दि.२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाैघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.