maharashtra

जुगार प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा


Nine people charged in gambling case
गुरुवार परज येथे जुगार प्रकरणी सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने धाड टाकून 9 जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयितांकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 4 मोबाईल असा एकूण 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा : गुरुवार परज येथे जुगार प्रकरणी सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने धाड टाकून 9 जणांवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयितांकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, 4 मोबाईल असा एकूण 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजेश संपतराव कदम, महेंद्र बजरंग बोराटे, सचिन नारायण कांबळे, मधुकर दादू घाडगे, कृष्णा यशवंत शेटे, यशवंत नारायण घोरपडे, किसन विष्णू देवरुख, मनोज मल्हारी शेलार, दिलावर मोहसीन शेख (सर्व रा. सातारा शहर परिसर, सांबरवाडी ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई गुरुवारी सांयकाळी सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने केली आहे.