कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाची जागा सातारा येथे नव्याने होणार्या मेडिकल कॉलेजसाठी देण्यात आली आहे. या जागेत पाटबंधारे विभागाची कार्यालये, वसाहती तसेच इतर निवासी, अनिवासी इमारती आहेत. या इमारती पाडण्याचे काम शासनाच्यावतीने हाती घेण्यापूर्वीच चोरट्यांनी धुडगूस घालत इमारतींची तोडफोड केली सुरू केली आहे.
निशांत धोगडी हा शनिवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठेतील सत्यम ज्वेलर्समध्ये गेला होता. त्याने सोन्याची चेन खरेदी करायची असल्याचे सांगून दुकानदाराकडून चेन बघण्यासाठी घेतली. त्यानंतर संधी साधून तो 30 ग्रॅम वजनाची सुमारे 1 लाख 50 हजार रूपये किंमतीची चेन घेऊन तो दुकानातून पसार झाला.
राज्यातील काही शहरांमध्ये काल आणि आज काही लोकांनी एकत्र येऊन, जमाव जमवून आज दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार केले. कालपासूनच मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे साताऱ्यात दंगली घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि कोणीही अशाप्रकारे दंगली, जाळपोळ करणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दंगलीस प्रोत्साहन देण्यासाठी रोहिंग्या, बांगलादेशी, पाकिस्तानी, तालिबानी जर साताऱ्यात लपून बसले असतील तर त्यांना ताबडतोब अटक करावी.
अभिनेत्री कंगणा रानावत हिने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेने शनिवारी पोवई नाक्यावर घोषणाबाजी केली. सेनेच्या नियोजित जोडे मारो आंदोलना पूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतल्याने आंदोलकांचा मात्र हिरमोड झाला.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला एक रकमी एफ.आर.पी अधिक सहाशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी 13 रोजी सातव्या दिवशीही सुरूच आहे.
भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे, त्यावरून कंगणाने इंस्टाग्राम पोस्ट करत टीकाकरांच्या वर निशाणा साधला आहे.
शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या वतीने ‘होम टू होम’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेच्या आरोग्य पथकाकडून नागरिकांचे प्रबोधन केले जात असून त्यामुळे पालिकेने सातत्य राखल्याचे दिसून येत आहे.
रयत शिक्षण संस्थेने कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या व्यवसायाभिमुख कोर्सच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब नलवडे यांची निवड केली. याबद्दल प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी त्यांचा सत्कार केला.
राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा उभारला आहे. त्यानुसार येथील बसस्थानकाबाहेरही कर्मचार्यांनी धरणे दिले असून शुक्रवारी त्यांनी थेट तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा काढला. यावेळी आंदोलन कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.