maharashtra

बहिणींच्या अंगावर कार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न


Attempt to kill the sister by putting a car on her body
कारमधून आलेल्या संशयितांनी दोघी बहिणींवर कार घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्या वाचल्या. याचवेळी संशयितांनी कारमधून एकाने कोयता काढून वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातूनही त्या बचावल्या.

सातारा : सातार्‍यातील गजबजलेल्या मल्हार पेठेत दि. 11 रोजी रात्री सव्वा अकरा वाजता बहिणी जेवण करुन चालत असताना त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.
कारमधून आलेल्या संशयितांनी दोघी बहिणींवर कार घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्या वाचल्या. याचवेळी संशयितांनी कारमधून एकाने कोयता काढून वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातूनही त्या बचावल्या. याचवेळी कारमधून एकाने बंदूक काढून फायरिंग करण्याचा प्रयत्न केला असता, बहिणींनी मदतीसाठी आरडाओरडा केला. संशयितांनी आलेल्या कारमधून तेथून पळ काढला. दरम्यान, संबंधित कार पांढरी असून त्यामध्ये अनोळखी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सुनीता अरुण तपासे (वय 28, रा.मल्हार पेठ, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.