maharashtra

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी

Five people were injured in two separate accidents in the district
गोळेवाडी, ता. कोरेगाव येथील संदीप संतदास पवार (वय 18) हे शेतीच्या कामासाठी घराबाहेर पडले होते. गावातील चौकात आल्यानंतर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा : जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
गोळेवाडी, ता. कोरेगाव येथील संदीप संतदास पवार (वय 18) हे शेतीच्या कामासाठी घराबाहेर पडले होते. गावातील चौकात आल्यानंतर त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना उपचारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुसर्‍या घटनेत भोगाव ता. वाई येथे चारचाकी वाहनाची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शनिवारी पहाटे झाला. सहदेव विठोबा तुपे (वय 70), सहदेव महादेव तुपे (वय 72), देवराज लक्ष्मण शेलार (वय 60) व तारुबाई पांडूरंग सुतार (वय 60, सर्व रा. वासोळे) हे चौघेजण चारचाकी वाहनाने प्रवास करत होते. त्यांच्या वाहनाला ट्रॅक्टर धडकल्याने हे जगमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.