कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मनिषा संतोष पवार (वय ३७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ही घटना बुधवार, दि. १0 रोजी दुपारी साडेतीन ते गुरुवार, दि. ११ रोजी सकाळी साडेआठ या वेळेत घडली असल्याची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
पंकज अरुण शिंदे (वय २७, रा. तुळजाभवानी कॉम्पलेक्स, पहिला मजला, फ्लॅट नंबर एक, राजवाडा, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ११ - बीएम ७0१८) बुधवार, दि. १0 रोजी रात्री नऊ वाजता ते राहत असलेल्या ठिकाणी पार्क केली होती.
दि.२५ आँक्टोंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीर प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मिनीबस (एम एच २३ वाय ६१७१) शेंद्रे परिसरात आरटीओ कार्यालयाच्या भरारी पथकाला सापडली. अधिक तपासणी करताना संबंधित वाहनांची कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर दंडात्मक कारवाई करून ते वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात अटकावून ठेवण्यात आले.
कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी परिसरातून लोखंडी पत्रे, पाईप, गज असा 62 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी झाला.
रिक्षा भाड्याने करण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकास कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीत नेवून रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटणार्या टोळीचा शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला. दरम्यान, हे कृत्य तडीपार गुंडाने केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नुकतेच सातारा जिल्हा रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना पत्र पाठवून सातारा वैद्यकीय महाविद्यालयासाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शंभर जागांना मंजूरी देत असल्याचे कळवले आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल. शिवाय एमबीबीएसच्या शंभर जागा निर्माण झाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.
नव्या युगातील वाटचाल करताना शिरवळसारख्या निमशहरी ठिकाणी समर्थ कृपा इन्स्टिट्यूटने युवतींसाठी फॅशन डिझाईनिंग, ब्युटिशियन, ऍक्टिंग, डान्स आणि जर्नालिझम सारखे कोर्सेस उपलब्ध केले आहेत. युवतींनी नव्या युवकाची आव्हाने स्वीकारताना या नवीन कला, कौशल्यात पारंगत व्हावे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडण्याची शक्यता आहे. महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त शिरोळ सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी 2920 रुपये येत्या 14 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केले आहे. सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने एकरकमी एफआरपी या कायद्याची अंमलबजावणी का करत नाहीत.