निढळ, ता. खटाव येथील रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने शेजारील रहिवाश्याने त्यांच्या कडील चारचाकीतून त्या व्यक्तिला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी एक च्या सुमारास आणले. रुग्ण दवाखान्यात गेल्यावर गाडी वळवताना इंजिनजवळील बॅटरीजवळ शॉर्टसर्किट होऊन गॅस किट असलेल्या गाडीने पेट घेतला. या आगीत चारचाकी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
भाजपच्या समर्थ बुथ अभियानामध्ये सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण मंडलाने उत्कृष्ट काम केले. याबद्दल वाई येथे पार पडलेल्या भाजपच्या सातारा जिल्हा कार्यकारिणी बैठकीत कराड दक्षिण मंडल टीमचा सत्कार करण्यात आला.
नेर, ता खटाव येथील स्वातंत्र्य सैनिकाची नातसून असलेल्या सौ मंजिरी निलेश चव्हाण यांनी नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी दोनवेळा सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केला. तशी पोहोचही घेतली, मात्र जाणीवपूर्वक त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले नाही. याबद्दल त्यांनी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.
महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम जरूर ग्रामीण भागापासून शहरापर्यंत केले पाहिजेत. परंतु, त्याचबरोबर महापुरुषांच्या विचारांचे अनुकरणही केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांनी केले.
थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी 28 रोजी कराड नगरपालिकेेतील लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
महात्मा फुलेंना अपेक्षित असा आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ,कोणत्याही बाबतीत कोणीही उपेक्षित, वंचित राहणार नाही ,समता,बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची जोपासना करत मी फुलेंच्या या कटगुण कुलभूमीचा कायापालट करणारच असे आश्वासन आमदार महेश शिंदे यांनी दिले
पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोल नाका येथे आज सकाळी कंटेनर व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी वरील वृद्ध महिला जागीच ठार, तर दुचाकीस्वार जखमी झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने कर्नाटकात खळबळ उडाली आहे. यामुळे कर्नाटक सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सिमेवर वाहनांची कसुन चौकशी सुरु आहे. राज्यात प्रवेश करण्यावेळी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोसचे प्रमाणपत्रक अथवा आरटीपीसीआर निगेटीव्ह टेस्ट बंधनकारक करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवार दि. 6 डिसेंबरला होणार आहे. याबाबतचे पत्र बँकेने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. बँकेत विद्यमान अध्यक्ष भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच नाव अध्यक्षपदासाठी गृहीत धरले जात आहे. तर या पदासाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
येथील एम. आय. डी. मध्ये असणाऱ्या युटोपीया कंपनीची बनावट कागदपत्रे बनवून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तसेच कंपनीच्या सामग्रीची चोरी करून नियमांचा भंग केल्याने 18 जणांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रसन्न देशमुख यांनी गुन्हा दाखल केला.