महात्मा फुलेंना अपेक्षित असा आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ,कोणत्याही बाबतीत कोणीही उपेक्षित, वंचित राहणार नाही ,समता,बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची जोपासना करत मी फुलेंच्या या कटगुण कुलभूमीचा कायापालट करणारच असे आश्वासन आमदार महेश शिंदे यांनी दिले
पुसेगाव : महात्मा फुलेंना अपेक्षित असा आदर्श समाज घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू ,कोणत्याही बाबतीत कोणीही उपेक्षित, वंचित राहणार नाही ,समता,बंधुता व स्वातंत्र्य या मूल्यांची जोपासना करत मी फुलेंच्या या कटगुण कुलभूमीचा कायापालट करणारच असे आश्वासन आमदार महेश शिंदे यांनी दिले
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची कुलभूमी कटगुण (ता. खटाव) येथे त्यांच्या पुण्यतिथी समारंभ, तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कोरेगाव-खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जि. प. शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कचरे, माजी उपसभापती संतोष साळुंखे, सर्व जिल्हा परिषद सदस्य, जि. प. चे वरिष्ठ अधिकारी, पंचायत समिती सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगले सर्व पंचायत समिती सदस्य, सरपंच जयश्री गोरे, उपसपंच जयदीप गायकवाड, माजी सरपंच सुधीर गोरे, माजी उपसरपंच उदय कदम, ग्रामस्थ व महात्मा फुले ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
उदय कबुले म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या कुलभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी कटगुणला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच महात्मा फुले सांस्कृतीक भवनाच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून तत्काळ निधी जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करुन दिला जाईल.
प्रदीप विधाते यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले
माजी उपसभापती संतोष साळुंखे, बाळासो गोरे, ज्ञानेश्वर कास्ते, आदर्श शिक्षिका सविता साबळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात आदर्श तालुका आणि जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण, प्रशासनाला गतिमान करणाऱ्या आणि लोकाभिमुख प्रशासकीय अधिकारी सत्कार व रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस सभारंभ संपन्न झाला. पंचायत समिती सभापती जयश्री कदम यांनी प्रास्ताविक केले. अजित चव्हाण, आबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी आभार मानले.