केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
एखाद्या गावाचा विकास करावा याचा आदर्श राज्याला घालून दिलेले ग्रामविकासाचे प्रणेते व हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद, मुंबई, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटिज पुणे व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पवार यांचा सत्कार सोहळा मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
चांदनी चौक ते मंगळवार तळे रस्त्याच्या खडीकरणाचे काम ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे रेंगाळले आहे . नगरसेवकांकडून पाठपुरावा होऊनही केवळ कामाच्या सबबी दिल्या जात असल्याने सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून त्यानुसार सातारा जिल्ह्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे नव्याने आदेश पारित केले आहेत ते आदेश 30 नोव्हेंबर रोजीच्या 00.00 वाजल्या पासून ते पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.
१९७१ बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहिद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभर शौर्याजंली यात्रा सुरू करण्यात आली आहे. या शौर्ययात्रेचे कराड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात जंगी स्वागत करण्यात आले.
म्हसवड येथे असलेल्या माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अॅन्ड रिसर्च सेंटरच्या फार्मसी कॉलेजमध्ये सचिवाच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी वैतागले असून या छळप्रकरणी 14 विद्यार्थ्यांनी थेट म्हसवड पोलीस ठाण्यात धाव घेतल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्ह्णून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी.
तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आलेल्या एका संशयितास कराड शहर पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीतील रेकॉर्डवरील ११ संशयीतांच्या टोळीला 6 महिन्याकरता तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सागर सुभाष सुर्यवंशी (वय २५) रा. हजारमाची ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
ओगलेवाडी, ता. कराड येथील चौकात तीन ऊसतोडणी मजूरांमध्ये किरकोळ कारणावरुन आपसात हाणामारी झाली. शनिवारी २७ रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अवैधरित्या गुटखा वाहतूक प्रकरणी शेंद्रेजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.